in

इगतपुरीत मुसळधार… धरणात मुबलक पाणीसाठा

15 जूननंतर इगतपुरीत मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक भागात पेरण्या सुरू केल्या. मात्र, एक महिना उशिरा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दुबार पेरणी संकट घोंघावत असतानाच दिलासा दिलाय. मागील चार ते पाच दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे.

आतापर्यंत 1 हजार 379 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आणि मागील 48 तासात सरासरी 250 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी निश्चितच सुखावले आहेत. धरणांनी देखील तळ गाठलेला असताना आता तालुक्यातील वैतरणा ,भावली, त्रिंगलवाडी मुकणे,भाम धरण तसेच दारणा धरणांमध्ये मुबलक साठा तयार झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल, गर्दी जमवल्याचा ठपका

जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर झाला पसार..