in ,

Momsoon 2021 | मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरूवात

मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर कायम असून आज सकाळपासून पुन्हा मूसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. परिणामी मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल यासारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलय. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर रेल्वे वाहतूकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

दरम्यान हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आरामदायी विस्टाडोम कोकण रेल्वे मार्गावरून धावली

बिग बी बोलतायत थेट कोरोना बाधित रुग्णांशी