in

फळ बागायतदार शेतकरी संकटात; अतिवृष्टीने सव्वा एकर पपई बाग तोडली

विकास माने, बीड | बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने केवळ खरीप पिकाचं नाही, तर फळ बागायतदार शेतकऱ्यांचे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परळीच्या पांगरी गावातील शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरून सव्वा एकरावर पपईची लागवड केली, मात्र अतिवृष्टीने सर्वच पीक पाण्यात तरंगत असल्याने फळबाग मोडून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पारंपरिक शेतीमध्ये आर्थिक घडी बसत नसल्याने दुष्काळी बीड जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत आहे. मात्र हवामान बदलाने आणि अतिवृष्टीने फळ बागायतदार शेतकऱ्यांचं देखील कंबरडे मोडले आहे. पांगरी गावातील रामकृष्ण तिडके यांनी लाख रुपये खर्च करून पपईची बाग उभी केली माञ पावसानं होत्याचं नव्हतं झालंय, त्यामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी केली जातेय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्याला कोळसा न देण्याचा केंद्र सरकारचा डाव; काँग्रेसचा आरोप

इम्तियाज खत्री पुन्हा एनसीबी कार्यालयात !