in

पुढील चार दीवस राज्यात मुसळधार पाऊस !

राज्यात पावसासाठी अनुकिल अशी परीस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दीवसात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण आणि मराठवाड्यातील पुढील दोन दिवस काही ठीकाणी तुरळक ते अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यातील काहि ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला असुन मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माहात्मा गांधी जयंती २०२१; जाणून घ्या इतिहास

सप्टेंबरमध्ये 21% ने वाढली भारताची निर्यात