in

हीना पांचाळला अखेर जामीन मंजूर …

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेत्री हीना पांचाळ ला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.तिच्यासोबतच आणखी २४ जणांना या प्रकरणी जामीन मंजूर झाला. पण त्याचबरोबर अंमली पदार्थ बाळगणारा व्यक्ती आणि ज्याच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी करण्यात आली होती त्यांचा जामीन मात्र फेटाळण्यात आला आहे

२६ जून ला मध्यरात्री नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकण्यात आलेल्या छाप्यात पोलसांनी हिनासह अनेकांना जेरबंद केल होत. यावेळी हिनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, २ महिला कोरीयोग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.

इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम त्या बंगल्यावर धाड टाकली होती, पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत असलेले 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं होतं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पावसामुळे नांदेड ते मुंबई जाणारी रेल्वे रद्द

कसारा घाटात दरड कोसळली; इगतपुरी स्थानकात प्रवाशांचा खोळंबा