in ,

उधारी करा, भीक मागा, पण रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवा; हायकोर्टानं केंद्राला फटकारलं

देशभरात ऑक्सिजनवरून गोंधळ सुरू आहे. तुटवडा जाणवल्यानंतर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. यानंतर ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून कोर्टानं केंद्र सरकारला कठोर शब्दांत फटकारलं आहे.

कोर्ट काय म्हणालं?

‘रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत सरकार एवढे बेफिकीर कसे काय असू शकते. कुणाच्यातरी हातापाया पडा, उधार उसनवारी करा, चोरी करा, पण रुग्णालयांसाठी ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना मरताना पाहू शकत नाही, अशा परखड शब्दात हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावलं.

दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले. तसेच गरज भासल्यास उद्योगांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याचीही सूचना केली. सध्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेली आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर लोक मरत आहेत, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रातील पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणमला दाखल

‘महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार’