in

साईसंस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना हायकोर्टाची नोटीस!

कूणाल जमदाडे, शिर्डी / अहमदनगर | साईसंस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.तदर्थ समिती आणि हायकोर्टाची परवानगी न घेता २५ कोटींची बिल अदा केल्या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आलीये.

साईसंस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.तदर्थ समिती आणि हायकोर्टाची परवानगी न घेता २५ कोटींची बिल अदा केल्या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली. केवळ दैनंदिन खर्च करण्याची परवानगी असतांना कोट्यवधींची बिल काढण्यात आली २०१९ मध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या एका याचिकेस साईसंस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेला केवळ दैनंदिन खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती.

ऑगस्ट २०२० मध्ये संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती झाली बगाटे यांनी तदर्थ समिती आणि उच्च न्यायालयाची परवानगी न घेता जवळजवळ २५ कोटी रुपयांची बिल परस्पर अदा केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वेळेवर पगार न झाल्याने बस चालकाची आत्महत्या

मालेगावात केवळ १० टक्के लसीकरण ; लसीकरणात सावळा गोंधळ!