in

Nashik Oxygen leaked: नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन-राजेश टोपे

नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 25 रुग्ण दगावल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. यासाठी आम्ही सात जणांची एक समिती नेमत असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे अध्यक्ष असतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे पुढे म्हणाले, हा प्रकार नेमका कसा घडला याची माहिती तज्ज्ञ कमिटी घेईलच. मी माझं मत सांगण चुकीचं होईल. आम्ही नेमणूक केलेली समिती नक्कीच एक स्टँडर्ड एसओपी देईल, असा मला विश्वास आहे.
प्रशासनाने सांगितलं की येथे ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे काहीही दिसत नव्हतं. मात्र, सगळे जीवावर उदार होऊन घटनास्थळी गेले. येथे लॉक तोडून ऑक्सिजनची गळती बंद करण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर उरलेलं 75 ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आलं. त्यानंतर गॅसचा टँकची वेल्डींग करण्यात आली असेही टोपे म्हणाले.

दरम्यान मृतांच्या नातेवाईंकाना राज्य सरकारकडून 5 लाख तर नाशिक पालिकेकडून 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gaja Marane Case | ”आता सापडणार नाही”, जामीन मिळाल्यानंतर संजय काकडेंची प्रतिक्रिया…

अनिल अंबानींची ‘ही’ कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला