in

३० वर्षे पोलिसात काम करून तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही? सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून, परमबीर सिंग यांना खडेबोल सुनावले आहेत.

तुम्ही ३० वर्षे महाराष्ट्र पोलिसांत काम करत आहात. मात्र, तुम्हाला महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही, तुम्हाला तुमच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही? हा धक्कादायक आरोप आहे. सगळ्याच गुन्ह्याविषयी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत. तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाऊ शकता, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंगांची कानउघडणी केली आहे.

माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात करण्यात येणारी चौकशी हा सुडाचा भाग असल्याचे म्हणत यासाठी महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. व्ही.रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र, परमबीर सिंग मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू शकता, असे न्यायालयाने म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

न्यायालयाने जामिन नाकारलेल्या कैद्याला दिले सोडून

वर्ध्यात परवाना संपलेल्या मेडिकलवर कारवाई