in ,

हेमंत बिस्वा शर्मा होणार आसामचे मुख्यमंत्री; उद्या घेणार शपथ

आसामच्या मुख्यमंत्रीपदी आता हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन दिवसांच्या बैठकांनंतर आज अखेर हेमंत बिस्वा शर्मा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. उद्या शर्मा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

आसामधील सत्ता भाजपने पुन्हा एकदा कायम राखली होती. त्यामुळे निवडणुकीतील विजयानंतर आसामच्या मुख्यमंत्रीपदी माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना कायम करणार की, हेमंत बिस्वा शर्मा यांना संधी मिळणार? अशी चर्चा होती.

दरम्यान, रविवारी सकाळी सोनोवाल यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर भाजपा संसदीय कार्यकारिणीची बैठक गुवाहाटी येथे पार पडली. या बैठकीत हेमंत बिस्वा शर्मा यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री आणि भाजपाचे नेते नरेंद्रसिंह तौमर, आसामचे पक्ष निरीक्षक अरूण सिंह हे उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘देशाला पंतप्रधानांचं घर नको, श्वास हवाय’

राजस्थानचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलाचे कोरोनामुळे निधन