in

मुंबई पाठोपाठ पुण्यातही होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात होळी सणावर बंदी घालण्यात आलीय.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी आणि धुलीवंदन सण/उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण/उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आलीय.

सदर मनाई आदेशाचं पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असंही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणालेत. तसेच जे कोणी आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलण्यात माहीर, नाना पटोले यांची टीका

शिवसेनेच्या नाकावर टिचून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा; संजना सांवत अध्यक्षपदी