in

हे तर षडयंत्र… अनिल देशमुखांनी विचारले महत्त्वाचे प्रश्न!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे, असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो, असं म्हणत त्यांनी परमबीर सिंह खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.

होम गार्डचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी सचिन वाझे प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. सचिने वाझे हे गृहमंत्र्यांचे वसुली एजंट असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच महिन्याला १०० कोटींचा निधी जमा करण्याचे देखील वाझेंना सांगितल्याची माहिती सिंह यांनी पत्रात दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी या आरोपांचं खंडन करत स्वत:ची बाजू मांडली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे

  • सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?
  • आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंह यांनी दिनांक १६ मार्च ला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअॅप चाट वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या संभाषणाच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या संभाषणातून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या संभाषणात आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?
  • 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हॉट्सअॅप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
  • – पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.
  • परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.
  • स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.
  • सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
  • विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

-स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे

  • मा. मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात कोरोनाचा कहर कायम : 27 हजारांहून अधिक रुग्ण, 92 जणांचा मृत्यू

आज MPSC ची राज्य सेवा पूर्व परीक्षा