in

‘पत्रकार परिषद घेतली पण …’ वादावरती गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला .

यावेळी शरद पवारांनी वारंवार देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सदर करून परमबीर सिंह यांनी नमूद केलेल्या वेळेत देशमुख रुग्णालयात होते अशी माहिती माध्यमांना दिली.पवारांच्या याच मुद्यावर विरोधकांनी पुन्हा हल्लाबोल करत पत्रात नमूद केलेल्या दिवशी देशमुखांनी पत्रकारपरिषद घेतल्याचा दावा केला आहे. त्याचा पुरावा देखील त्यांनी सोशल मिडीयावर दिला आहेत. या वादावरती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्र्यांवर होणारे आरोप प्रत्यारोपावर अनिल देशमुखांनी उत्तर दिले आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना पत्रकार परिषद घेतली अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषद झाल्यानंतर मुंबईत होम क्वारंटीन झालो असे स्पष्टीकरण देखील अनिल देशमुख यांनी यावेळी दिले.राज्यात चालू असणाऱ्या या प्रकरणाचे पडसाद लोकसभेमध्ये उमटलेले दिसले. या प्रकरणी रोज नवी माहिती समोर येत असल्याने सर्वांचेच लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘आरोपांमध्ये तथ्य नाही, देशमुखांचा राजीनामा नाही’

लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी काळाच्या पडद्याआड