माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान याकडेचं संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणात परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे या याचिकेवर उद्याच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Comments
Loading…