in

“पूजा चव्हाण प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट अद्याप तपास अधिकाऱ्यांकडेच”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तपास अधिकाऱ्याने क्लोजर रिपोर्ट सरकारकडे किंवा न्यायालयात सादर केलेला नाही अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. वळसे पाटील यांनी आज पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपल्याला काही माहिती नाही. त्यावर मी बोलू शकत नाही, असं ही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटी बद्दल विचारल्यानंतर अधिवेशन सुरू होत असल्याने या बैठकी होत असल्याचं त्यांनी म्हटलं. तर कृषी कायदे, शेतकरी आंदोलन अशा विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली असेल, असं गृहमंत्री म्हणाले.

तर चंद्रकांत पाटील यांनी नागपुरातून कोणालाही रात्रीत अटक होऊ शकते असं वक्तव्य केलं होतं. त्यावर थेट न बोलता, त्यांच्याकडे तशी माहिती असेल, असं म्हणत वळसे यांनी विषयाला बगल दिली.

वळसे पाटील यांनी आज येरवडा कारागृहाची पाहाणी केली. नवीन जेल निर्मिती संदर्भात सरकारी पातळीवर निर्णय घेईन, असं ते म्हणाले. लोणावळा किंवा इतर पर्यटन ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहन ही त्यांनी केलंय. पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी नवीन जागा लवकरच देण्यात येणार असल्याचे आणि कर्मचारी ही लवकरच वाढवणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न”

बजाज फायनान्सच्या जाचाला कंटाळून वर्ध्यात कर्जबाजारी व्यक्तीची आत्महत्या