in

राज ठाकरे | ‘गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा , केंद्राकडे चौकशीची मागणी’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते आक्रमक होत, त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. आज अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंज येथे माध्यमांशी संवाद साधला.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. सर्व प्रकरणाचा मूळ विसरू नका, सुशांत सिंगच्या संदर्भात सुद्धा असेच झाले.
राज्यात शहरं किती, त्यांना आयुक्तांना गृहमंत्र्यांनी काय सांगितलं हे अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे देशमुख यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. त्याच प्रमाणे अतिरेकी ठेवतता हे ऐकलं होतं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं, देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. या प्रकरणी केंद्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

दुनियेमध्ये कुठेही जर मुंबई पोलिसांपेक्षा चांगले पोलीस कुठेही सापडणार नाहीत. पण राज्यकर्त्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होते आहे. यामध्ये योग्य कार्यवाही न झाल्यास हा देश अराजकता कडे चाललाय हे लक्षात ठेवा असे देखील त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज ठाकरे | गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ; केंद्राकडे केली चौकशी मागणी

भाजप नेते राम कदम आणि अतुल भातखळकर यांना अटक