in

Covid vaccine; मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण

मुंबईत येत्या १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण उपक्रमाला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं उच्च न्यायालयात या संदर्भात माहिती दिली आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आणि अंथरुणावर खिळलेल्यांसाठी डोर-टू-डोर कोरोनावरील लसी देण्याच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी पार पडली.

मुंबई उच्च न्यायालयात आज राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी १ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण सुरु करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसेच, या लसी महापालिकेतर्फे देण्यात येणार असून त्या मोफत असणार आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अॅड. अनिल साखरे यांनी दिली.

3 हजार 500 नागरिकांची नोंदणी

राज्य सरकारने या संदर्भात सर्व्हेक्षण केले आहे. या सर्व्हेक्षणानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत ३,५०० पेक्षा जास्त रुग्णांनी घरी लस देण्यास रस दर्शवला होता. हे लक्षात घेता राज्याने १ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई येथे लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर इतर भागात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MAHA TET Exam | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा कालावधी ठरला

संगमनेरच्या प्रतिआळंदीत आषाढीनिमित्त दोन क्विंटल खिचडी वाटप!