in

साप्ताहिक राशी भविष्य 22 मार्च ते 28 मार्च 2021

सप्ताहाच्या सुरुवातीला 22 तारखेला चंद्राचं भ्रमण मिथुन राशीत आर्द्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात असून शेवटी 28 तारखेला कन्या राशीत हस्ता नक्षत्राच्या पहिल्या चरणात असेल. या सप्ताहात मंगळ राहूचा अंगारक योग, या अंगारक योगावर गुरुची दृष्टी, तसेच उच्चेच्या शुक्रवार आणि सूर्यावर शनिची दृष्टी असे विशेष योग प्रत्येक राशिवार काय परिणाम करतील, ते आज आपण पाहू.

शुभ दिवस – 22, 23
अशुभ दिवस – 24, 25, 26, 27,

मेष
सप्ताहाच्या पूर्वार्धात आरोग्याच्या तक्रारी, अकस्मात खर्च होतील. स्वकर्म आणि आत्मपरीक्षण समाजात प्रतिष्ठा वाढवेल. मानसिक दुबळेपणा, आळस, देखाव्यावर खर्च टाळा. मध्यंतरानंतर भागीदारीत आर्थिक लाभ, नोकरीत यश मिळेल. शेयर, सट्ट्यामधे यश मिळेल; परंतु गोपनीय माहितीचा खुलासा मानसिक आणि आर्थिक नुकसानाचं कारण बनेल. उत्तरार्धात, कौटुम्बिक, व्यावसायिक सामंजस्य लाभेल. नोकरीत बदल, बढतीचे योग. प्रेमप्रकरणात अप्रत्यक्ष लाभ होईल.

उपाय – नित्य हनुमान चालीसा पठण.

वृषभ
सप्ताहाच्या पूर्वार्धात, व्यवसायात गुंतवणूक करताना जोखमीची ठरेल. वाणीवरचा संयम कामाच्या ठिकाणचा मानसिक तणाव दूर करेल. ध्यानधारणा प्रक्षोभक परिस्थिती टाळू शकेल. मध्यंतरात वातावरण उत्साहवर्धक, घरी आप्तांच्या भेटीगाठी होऊन आर्थिक प्रश्न सुटतील. उधारी, कर्ज घेणं टाळा. अध्ययन, अध्यात्म यामुळे सकरात्मता वाढवून नोकरी व्यवसायात यश मिळेल. आईच्या तब्बेतीची विशेष काळजी घ्या. विवाह किंवा नवीन प्रेमप्रकरण जुळतील. जोडीदाराबरोबर ताळमेळ जमेल. वडिलांमुळे किंवा मालमत्ता विक्रीमुळे, विदेशाशी जोडलेल्या कामामुळे धनलाभ संभवेल.

उपाय – पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दीप प्रज्ज्वलन करा.

मिथुन
सप्ताहाच्या पूर्वार्धात भाग्याची साथ नसेल. शेयर, सट्टा, जुगार यापासून दूर राहणे. जोखीम असलेले निर्णय, गुंतवणूक टाळा. नोकरी व्यवसायात हानी, प्रेमप्रकरणात निराशा, दुर्घटनेमुळे इजा, ज्येष्ठांच्या स्वास्थ्य तक्रारी, बचतीत कपात कौटुम्बिक वाद संभवतात. मध्यंतरानंतर परिस्थितीत सर्वार्थाने शुभाशुभ फळे मिळतील, कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरवतील. नोकरीत बदल, बढतीचे योग येतील. नवीन बिझनेस डील घडतील. भागीदारीचे प्रश्न सामोपचारात सोडवा. उत्तरार्ध प्रसन्न असेल. जोडीदाराबरोबर रमणीय स्थळी प्रवासयोग घडतील. व्यवसायात विशेष धनलाभ घडेल.

उपाय – श्रीदुर्गास्तोत्र पठाण.

कर्क
सप्ताहाच्या सुरुवातीला स्वास्थ्य तक्रारी त्रास देतील. नशा, व्यसन तसेच मादक पदार्थापासून दूर राहिल्यास आर्थिक नुकसान टळेल. मध्यंतरात एखादी गोड बातमी उत्साहवर्धक ठरेल. वडिलोपार्जित व्यवसाय किंवा वडिलांकडून आर्थिक लाभ होईल. चढउतार असलेल्या उद्योगात विशेष आर्थिक लाभ मिळेल. घराचा जमाखर्च संतुलित राहील. परदेशात शिक्षण घेणाऱ्याना विशेष फलदायी असेल. उत्तरार्धात, घरातील क्लेश आणि अचानक पडलेली जबाबदारी मानसिक तणावाचे कारण बनेल. वादविवाद धनहानी देतील. ब्राह्ममुहूर्तावर ध्यानधारणा विशेष फळ देईल, फक्त त्यावेळी शनीचा होरा टाळणे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मालमत्ताविक्री अचानक धनलाभ देईल, परंतु विदेश, आयात- निर्यात, वाहतूक धनहानी देतील.

उपाय – शिवलिंगवर जलाभिषेक

सिंह
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाची द्वीधा अवस्था, घालमेल तसेच धैर्याची कमी असल्यामुळे व्यवहारात घाईघाईत घेतलेले निर्णय हानी पोहोचवतील. अर्थगुंतवणूक व्यावसायिक लोभाला बळी पडून करू नका. राजकारणात आणि समाजात नकारात्मक प्रसिद्धी आपल्या प्रतिमेला धोका पोहोचवू शकेल. व्यवसायात यश अवघड असून कर्जवाढीमुळे एकाग्रता भग्न होऊन आत्मविश्वास ढळू देऊ नका. मध्यंतरात भागीदारीत धोका, शत्रू जरी छोटा दिसला तरी, कमजोर समजू नका. उत्तरार्धात नोकरीमध्ये बढतीचे योग, वातावरणात उष्णता वाढल्यामुळे पाण्याची कमतरता तसेच बाहेरील खाणं टाळा. पोटाचे तसेच त्वचेचे आजार डोकं वर काढतील. प्रेमप्रकरणात निराशा. मालमत्ताविक्रीतून धनलाभ.

उपाय – सूर्याला अर्घ्य “ॐ घ्रिणीः सूर्याय नमः”मंत्र म्हणून द्या.

कन्या
सप्ताहाच्या सुरुवातीला सौभाग्यशाली योग घडेल. परंतु भावनांवर नियंत्रण ठेवून भावनाविवश होणं टाळा. देणेकरी वाढतील, कर्ज परतफेड करताना आर्थिक विवंचना जाणवतील. वास्तविकता आणि महत्वाकांक्षा याचं भान ठेवलंत तर, अपेक्षाभंग टाळू शकाल. मध्यंतरात, नोकरी मिळवण्यास मित्र सहयोग करतील. अभिनय, कायदा, साहित्य यावर लिखाण प्रसिद्धी देईल. धनलाभाचे विविध स्रोत उत्पन्न होतील. उत्तरार्धात, कौटुंबिक आनंद मिळेल, उत्तम बातमी आनंद द्विगुणित करेल. विदेशगमन अथवा विदेश कायमस्वरूपी व्हिजा, विदेशात नोकरीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील. प्रेमप्रकरणात चमत्कारीक बदल होतील. स्वास्थ्यावर खर्च होतील.

उपाय – श्री वैभवलक्ष्मी व्रत किवा पूजा करा.

तुला
सप्ताहाच्या सुरुवातीला मिश्रफल मिळतील. भाग्य लाभले तरी, प्रयत्नांची कास सोडू नका. व्यापारात नवीन संधी आर्थिक लाभ देतील. विदेशी कंपनीतून उत्तरदायित्व प्राप्त होईल. मध्यंतरात उत्साहवर्धक वातवरणाची अनुभूती आली तरी, मनासारख्या गोष्टी नाही घडल्या म्हणून ताणतणाव वाढून देऊ नका. नोकरी कामधंद्यात यश मिळेल, पण शीघ्रकोपी स्वभाव निर्णयक्षमता चुकवू शकतो. उत्तरार्धात, सहकाऱ्यांना सुवागणूक भविष्यात फलदायी ठरेल. कठोर परिश्रमांती परमेश्वर याची प्रचिती येईल. भावंडांकडून मदत तसेच आईवडिलांच्या आशीर्वादाने नवीन वास्तुमध्ये निवेश संभवेल. बुद्धिमान जोडीदाराच्या साथीने प्रगतीकडे वाटचाल होईल. विदेशाशी सलग्न धनलाभ संभवेल.

उपाय – श्रीगणेशाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून दीप प्रज्ज्वलन करा.

वृश्चिक
सप्ताहाची सुरुवातच मिश्रफलित असेल. मानसिक ताणतणाव, आर्थिक अडचणी नकारात्मक वलय निर्माण करतील. कामाच्या ठिकाणी एकाग्रता भंग पावल्यामुळे वरिष्ठांकडून अपेक्षाभंग होईल. मध्यंतरात, अचानक मौल्यवान वस्तू हरवणं किंवा चोरीला जाणं अशा घटना घडू शकतील. तत्परता दाखवून व्यवसायात यश संपादन करता येतील. घरातील ज्येष्ठांकडून मदत तुम्हाला सावरू शकेल. भागीदारीत यश नाही. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात यश मिळेल. उत्तरार्धात, नशेमुळे नुकसान तसेच समारंभात व्यसनाचे आमिष धोका देऊ शकतात. आपल्या मुलांबरोबर छान वेळ घालवता येईल. जोडीदाराबरोबर मतभेद तसेच प्रेमप्रकरणात तणाव वाढतील. खर्च वाढतील.

उपाय – श्री हनुमानाला बत्ताशाचा नैवेद्य दाखवा.

धनु
सप्ताहाच्या सुरुवातीलाच अचानक बाधा येऊन मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. नवीन व्यवसाय अथवा अर्थगुंतवणूक टाळा. खर्चाची मर्यादा ओळखून खर्चयोजना करा. मध्यंतरात, बेरोजगाराना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जफेडीकरता नवीन आर्थिक स्रोत निर्माण होतील. शेअर मार्केटमधून तसेच आपली स्थावर मालमत्तेला चांगला भाव येऊन त्यातून अपेक्षेपेक्षा जास्त अर्थार्जन होईल. उत्तरार्धात, अर्थगुंतवणूक करताना सल्ला घेणे गरजेचे असेल. कामाच्या ठिकाणी अंतर्गत कारस्थान त्रस्त करतील. परंतु कौटुंबिक सहयोग प्राप्त झाल्यामुळे मानसिक तणाव नाहीसा होईल. परिवारासाठी विशेष खरेदी योग असेल. डोळ्यांची काळजी घ्या तसेच यकृताची तसेच दाताचे विकार संभवतील.

उपाय – श्री विष्णुसहस्त्रनाम पठण.

मकर
सप्ताहाची सुरुवात मिश्र फलितच असेल. द्विधा मनस्थिति, ताणतणाव निराशेचे कारण बनेल. नवीन विचार निष्कर्ष करू शकणार नाहित. वरिष्ठांकडून अपमान तसेच मतभेद होतील. मध्यंतरात व्यवसायात अनुकूल वातावरण निर्मिती होईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी असेल. कौटुंबिक वातावरण उत्साही होऊन सकारात्मक घटना घडतील. आईवडिलांचे स्वास्थ्य सुधरेल. उत्तरार्धात, व्यापारात शुभसंकेत मिळतील. नवविवाहित दाम्पत्याला संतान प्राप्तीसाठी उत्तम काळ असेल. शेअर्समुळे अचानक धनलाभ होईल.

उपाय – श्री दुर्गासप्तशतीचा पाठ करावा.

कुंभ
सप्ताहाच्या सुरुवातीला आनंदमय, प्रसन्न वातावरण असेल. खासगी आयुष्यात मनोकामना पूर्तता होतील. परंतु व्यावसायिक अडचणी तर, सहकाऱ्यांबरोबर मतभेद संभवतील. मध्यंतरात परिस्थिति मनाजोगी अनुकूल होण्यास मदत होईल. पराक्रमामुळे धनप्राप्ती होईल. नोकरीमध्ये निर्णय अचूकतेमुळे वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त होऊन कार्यकुशलता वाढेल. उत्तरार्धात राजकारणात तसेच सरकारी कामामध्ये यश मिळेल. नोकरीमध्ये बदलीचे योग. स्वास्थ्य सन्तुलनासाठी दिनचर्येत शिस्त आवश्यक. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात निराशा किंवा तणाव जाणवेल.

उपाय – श्री वैभवलक्ष्मीपूजा करून गुलाबाचे फूल वाहणे.

मी
सप्ताहाच्या पूर्वार्धात लाभदायक घटना मानसिक प्रसन्नता देतील. नोकरी व्यवसायात मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल. नियमित व्यायाम, संतुलित आहार दिनचर्येत असणं लाभदायक ठरेल. मध्यंतरात, व्यापारात नवीन उपक्रम निर्णायक ठरतील. नोकरीत स्थानपरिवर्तन, बढतीचे योग सुखसमृद्धी देतील. कोर्टकचेरी, सरकारी कामात यश मिळेल. उत्तरार्धात, मित्रसहयोग तसेच कर्जपरतफेड घडवेल. एकमेकांना वेळ न दिल्यामुळे जोडीदाराबरोबर वादविवाद संभवतील. सामंज्यस्यातून सहज प्रश्न सुटतील.

उपाय – शिवलिंगावर चांदीच्या पात्रातून जलाभिषेक.

शुभं भवतु

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sharad Pawar Live | उद्या पर्यंत देशमुखांचा निर्णय घेऊ – शरद पवार

देवेंद्र फडणवीस LIVE | गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन चौकशी करा