in

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन; किरीट सोमय्या यांचं ट्वीट

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. या अटक प्रकरणात त्यांना जामीन मिळाल्याचेही बोलले जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण प्रकरणात आणि मारहाण प्रकरणी अटक झाली असल्याची खळबजनक माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे .

आरोप काय ?
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चंद्रपुरात दुसरा दीक्षा सोहळा

गुंड मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेऊ नये, किरीट सोमय्यांची मंत्री आव्हाडांवर टीका