in

“बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” – अमृता फडणवीस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या आरोपानंतर राजकीय विश्वातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.

आता या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत सरकारवर व अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे. “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” असं ट्विट त्यांनी केलंय. हॅशटॅगमध्ये ‘सचिन वाझे’ आणि ‘टार्गेट 100 कोटी’  असं देखील म्हटलं आहे. असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंग वादानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच ट्विट

कोई कुछ बोला तो मनसुख जैसा मरेंगा ! – अमृता फडणवीस