in ,

”राज्यातील जनतेला किती लसी मोफत देणार?”

गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मोफत लसीकरणाची घोषणा झाली असली तरीही या वयोगटातील नागरिकांचं १ मेपासून लसीकरण होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

यावर बोला राजेश टोपे, किती लसी विकत घेणार आणि राज्यातील जनतेला किती लसी मोफत देणार? असा सवाल अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे. लसीचा तुटवडा आहे हे रडगाणं सुरू ठेवायचं. खासगी रुग्णलायात लस विकतच घ्यावी लागेल हेही सांगायचं आणि लस विकत घ्यायला आमच्याकडे लसीच नाहीयेत असा कांगावाही करायचा. त्यामुळे राज्य सरकारची ही घोषणा लोकप्रियतेची घोषणा ठरेल असंच दिसतं. राज्य सरकार खुल्या बाजारातून किती लसी विकत घेणार आणि जनतेला मोफत देणार हे त्यांनी जाहीर करावं त्यानंतरच लोकांचा खऱ्या अर्थानं यावर विश्वास बसेल,” असं भातखळकर म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिरमच्या अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार; गृहमंत्रालयाचे आदेश

कोल्हापूर, नाशिक, जालन्यात मुसळधार पाऊस