in

आता गुपचूप पाहू शकतो कोणाचंही WhatsApp स्टेट्स; वाचा काय आहे ट्रिक?

व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज हे स्टेटसला ठेवत असतो. अनेकदा इतरांनी ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस हे आपल्या प्रचंड आवडतात.

स्टेटस हे 24 तासांनंतर निघून जातात. आपलं स्टेटस कोणीकोणी पाहिलं हे देखील समजतं. काही वेळा एखाद्याचं स्टेटस आपल्याला पाहायची इच्छा असते पण ते समोरच्या व्यक्तीला समजू नये असं देखील वाटतं असतं.

एखाद्याचं स्टेटस गुपचूप पाहायची इच्छा असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. Facebook च्या मालकीचे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ‘रीड रिसिप्ट्स’ नावाचे फीचर आहे. रीड रिसिप्ट्स फीचरद्वारे समोरील व्यक्तीपर्यंत मेसेज पोहचला की नाही हे आपल्याला समजतं.

मेसेज वाचल्यानंतर ब्लू कलरची टीक येत असते. जर तुम्ही ‘Read Receipt’ फीचर बंद केलं तर समोरील युजरला तुम्ही मेसेज वाचला आहे की नाही व स्टेट्स पाहिलं की नाही, हे समजणार नाही.

असं पाहा स्टेटस :
▪️ सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.
▪️ होम स्क्रीनवरील डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
▪️ सेटिंग्सवर टॅप करा. सेटिंग्समध्ये अकाऊंट पर्यायावर क्लिक करा.
▪️ त्यानंतर आता प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.
▪️ यामध्ये Read Receipt फीचर इनेबल करा.

दरम्यान, रीड रिसिप्ट फीचर बंद केल्यानंतर तुम्ही WhatsApp स्टेटस पाहिले की नाही हे समजणार नाही. मात्र, तुमचं स्टेट्स देखील कोणी पाहिलं हे देखील तुम्हाला समजणार नाही. इतर माध्यमातून देखील तुम्ही लपून-छपून स्टेट्स पाहू शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीत दलित समाजाच्या लोकांवर जातीय अत्याचार;100 जणांनी गाव सोडून ठोकला पाझर तलावावर मुक्काम