in

दारुड्या पत्नीचा पतीनेच केला खून

प्रशांत जगताप | साताऱ्यातील नागठाणे येथे पत्नीला दारूचे व्यसन असल्याच्या कारणातून पतीनेच खून केल्याची घटना घडली आहे. मालन बबन गायकवाड असे या 55 वर्षीय महिलेचे नाव आहे. संशयित आरोपी पतीला 6 तासांत पोलिसांनी जेरबंद केले.

पत्नी मालन बबन गायकवाड हिला दारूचे व्यसन असल्याने ते पतीला न आवडल्याने दोघांच्यात वारंवार भांडणे होत होती. दरम्यान अशाच भांडणा दरम्यान पती बबन गायकवाड याने पत्नीला लाकडी दांडकाने मारहाण केली. या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाला.

बोरगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी असलेल्या पती बबन गायकवाडला अवघ्या 6 तासांत ताब्यात घेतलं. तसेच आरोपीच्या घरातून 300 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी अविनाश साळुंखे त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पैठणमध्ये दिव्यांगांसाठी लसीकरण सुरू

दिग्दर्शक संजीव कोलते घेऊन येतायत ”अशी ही भन्नाट भिंगरी”