in

कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील भाडणे येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. ठिकठिकाणी कचरा साचला आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रुग्ण हैराण झाले आहे. हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज देसले यांच्या पाहणीत उघडकीस आला. प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये दोन दिवसांत स्वच्छता केली नाही तर मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. साक्री शहरासह तालुक्यातील बाधित रुग्णांवर भाडणे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहे. सद्य-स्थितीत या ठिकाणी ५५ रुग्ण दाखल झाले आहेत. कोविड सेंटरची मनसेचे धीरज देसले यांनी पाहणी केली. या वेळी त्यांना या ठिकाणी कचरा व अस्वच्छता आढळून आली. तसेच उपचार कक्षाच्या बाहेर कचरा साचलेला आहे. याविषये प्रशासनाला विचारणा केल्यावर ठोस उत्तर मिळाले नाही. कोविड केअर सेंटरमधील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांकडून तसेच तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात संपर्क कक्ष स्थापना करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

‘या’ स्मार्टफोनवर मिळणार मोठा डिस्काउंट