in

NEET परीक्षेला माझा विरोध नाही, पण यामुळं गरीब विद्यार्थी मागे पडू नये – रोहित पवार

मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. राजन यांनी नुकताच तमिळनाडू सरकारला NEET परीक्षेसंदर्भात एक अहवाल दिला आहे. NEET परीक्षा सुरु राहिली तर भविष्यात तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी डॉक्टर्स देखील मिळणार नाहीत, अशी चिंता राजन यांनी व्यक्त केली आहे.

“NEET परीक्षेची तयारी करताना मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी कोचिंग क्लासचं भरमसाठ शुल्क भरणं आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. परिणामी NEET परीक्षेमुळं आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या विद्यार्थ्यांना तुलनेने अधिक सीट्स मिळत असून गरीब विद्यार्थी मात्र दूर लोटले जात आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपली भूमिका मंडळी आहे.

“NEET परीक्षेला माझा विरोध नाही, राष्ट्रीय स्तरावरच्या संधी उपलब्ध होणं, यासारखे NEET चे अनेक फायदेही आहेत. पण यामुळं गरीब विद्यार्थी मागे पडू नये, हा माझा प्रमुख मुद्दा असून तसं होत असेल तर त्याला बळ देण्याची गरज आहे. कुठलीही गोष्ट असू द्या त्याचे फायदे-तोटे असतात.

त्याप्रमाणे NEET चेही आहेत. फक्त यात कोणाचं जास्त नुकसान होणार नाही आणि आर्थिक कारणामुळं कोणी स्पर्धेत मागं पडणार नाही, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल आणि ती केंद्र आणि राज्य सरकारे घेतील, ही अपेक्षा!” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”

Naughty Raj Kundra | राज कुंद्राच्या अटकेनंतर नेटकऱ्यांकडून मिम्सचा पाऊस