in

घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला- संजय राठोड

महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख या दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिल्याचे प्रकरण चर्चेत असताना आता पहिला मंत्री असलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी घाणेरड्या राजकारणामुळे आपल्याला राजीनामा द्यावा लागला असल्याची खंत व्यक्त केली.

टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान या राजीनामा प्रकरणानंतर आता संजय राठोड यांनी समाजाच्या भेटीगाठी व समाजबाधणीसाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आज पालघर जिल्ह्यातील वसईतून केली. यावेळी त्यांनी राज्याच्या घाणेरड्या राजकारणामुळे मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, हे खूप दुर्दैवी असल्याचे वक्तव्य राठोड यांनी केले.

वसईच्या देवीपाडा तांड्यावर जाऊन त्यांनी समाजाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत बंजारा चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार सोबत होते. वसईला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि क्रांतिकारी इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतील समाज या परिसरात वसलेला आहे. त्यासाठी मी वसई हे मी माझ्या दौऱ्याचे पाहिले ठिकाण निवडले आहे. कोरोनाचा संकट काळ चालू आहे, आमचा बंजारा समाजाचा नागरिक हा वीटभट्टी, मोलमजुरीचे काम करणारा आहे. अशा काळात त्यांना मदत आणि धीर देण्याची गरज आहे. कोरोना हे संकट जागतिक महामारी आहे. या महामारीत माझा बंजारा समाजाच्या वेदना, समस्या समजून घेणे, त्यांच्या प्रत्येक संकटात सहभागी होणे हे माझे कर्तव्य असेही संजय राठोड यांनी सांगितले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपूरात एकाच बेडवर पॉझिटिव्हसह संशयित रुग्णावर उपचार

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री