in

मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे , ‘मी पुन्हा येईन‘ ची आशा- देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई मध्ये मी अनेक वेळा येत असून येथील आमदार , लोकप्रतिनिधींच्या कौतूकामुळे मी आताही मुख्यमंत्री असल्याचेच मला वाटत असल्याचे व्यक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मी परत मुख्यमंत्री होताच नवी मुबंईतील गोवर्धनी मातेच्या दर्शनासाठी येणार असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी ‘ मी पुन्हा येईन ‘ ची आशा व्यक्त केली.

सीबीडी येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी ठेववेल्या विकास कामांच्या उदघाटना प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केली. आधूनिक अशा फिरत्या शोचालयाचे , ॲम्ब्यूलन्सचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर कोळी महिलांना मासे विक्री परवानाचे वाटप करण्यात आले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापुरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटत असल्याचे म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

“गणेश नाईक असतील, तुम्ही (भाजपा आमदार मंदा म्हात्रे) असाल, पाटील साहेब असतील यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“राज्याची 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार”

…नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही; पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा