in

IPL 2021 : जोपर्यंत खेळेन तोपर्यंत RCB चा भाग असेन, कर्णधारपद सोडताना विराट भावूक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या कर्णधारपदाच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात कोलकात्याकडून पराभूत झाला त्याचबरोबर यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात आलं. सामन्यानंतर विराट खूपच भावूक झाला होता.

सोमवारच्या प्लेऑफ सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला. या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचं कोहलीनं आधीच जाहीर केलंय. विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला, ‘मी संघात अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात तरुण खेळाडू येऊन आक्रमक खेळ दाखवू शकतील. मी भारतीय संघासाठीसुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला. मी फक्त एवढेच म्हणेन की मी माझ्याकडून 120 टक्के संघाला दिले आणि यापुढेही खेळाडू म्हणून देत राहीन.

सामन्यानंतर त्याने आरसीबी फ्रँचायजी आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतच्या सपोर्टबद्दल त्याने आभार व्यक्त करताना यापुढे एक खेळाडू म्हणून मी माझ्यावतीने 120 टक्के देईल, अशी ग्वाहीही दिली.ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर जोपर्यंत मी आयपीएलमध्ये खेळेल तोपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग असेन, असं विराटने सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ; निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे कारवाई होणार

राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC