in

ICC RANKINGS : मितालीच एक नंबर !

भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पुन्हा प्रथम स्थान पटकावले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत मितालीने ही कामगिरी केली.

महिला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०३च्या सरासरीने २०६ धावा केल्या. या मालिकेत ती सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होती. २००५मध्ये ती पहिल्यांदा एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरली होती. मितालीचे ७६२ रेटिंग गुण झाले आहेत. गेल्या आठवड्यात प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरलेली वेस्ट इंडीजची स्टेफनी टेलर चार स्थानांनी घसरत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची लिजेल ली, ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली आणि इंग्लंडची टॅमी ब्यूमॉन्ट यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान मिळवले आहे.

स्मृती मंधानाने टी-२० क्रमवारीत करिअरमधील सर्वोत्कृष्ट तिसरे स्थान मिळवले आहे. तिच्याखेरीज दीप्ती शर्मा ३६ व्या आणि रिचा घोष ७२व्या स्थानावर आहे.

‘नॅशनल क्रश’ नवव्या स्थानी

भारताची ‘नॅशनल क्रश’ म्हणजेच स्मृती मंधाना ७०१ रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे. मिताली आणि मंधाना व्यतिरिक्त इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला पहिल्या १० मध्ये स्थान मिळालेले नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Local Restart | “…तोपर्यंत लोकल सुरु करता येणार नाही,” – अस्लम शेख

तानसा धरण भरलं काठोकाठ; 33 गावांना सतर्कतेचा इशारा