मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “पचास इधर देंगा,पचास उधर देंगा, फिर धूर्त राजा कुछ क्यूँ बोलेंगा, अवाम को चूना लगाके खुद ऐश कारेंगा !
कोई कुछ बोला तो मनसुख जैसा मरेंगा ! चोर चोर मौसेरे भई !
मिल बाँट के नोट महावासुलीअघडी ने खई !” असे ट्विट करत त्यांनी राज्य सरकारला लक्ष करत राज्य सरकारचा महावसुली आघाडी असा उल्लेख केला आहे.
Comments
Loading…