in

Wrestler murder case| पैलवान सागर धनकड हत्या प्रकरणीत सुशील कुमारच्या अडचणीत वाढ

पैलवान सागर धनकड हत्याप्रकरणी पैलवान सुशील कुमार च्या अडचणीत वाढ झाली आहे. सागर धकडला हॉकी स्टीकने मारहार करताना सुशील कुमारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी सुशील कुमारचा आणखी एक साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

पैलवान सुशील कुमार प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच आपला या प्रकरणाशी कोणताही संबध नाही, ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा आपण स्टेडियममध्ये उपस्थित नव्हतो असेच सांगतोय पण समोर आलेल्या या व्हिडीओमधून सुशील कुमार खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालंय. या व्हिडीओमध्ये सुशील कुमार सागर धनकडला हॉकी स्टीकने मारहाण करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुशील कुमारला अडवण्यासाठी अनेकजण येत आहेत पण त्या सर्वांना बाजूला करुन सुशील कुमार हा सागरला मारताना दिसतोय.

या वेळी सुशील कुमारकडे एक पिस्तुल असल्याचं सांगण्यात येत होतं. या व्हिडीओमध्ये एक पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला व्यक्ती अशी पिस्तुल हातात घेऊन स्टेडियममध्ये वावरताना दिसतोय. समोर आलेला हा व्हिडीओ पैलवान सागर धनकड हत्येप्रकरणी मोठा पुरावा मानला जात आहे. हा पुरावा आता पोलीस न्यायालयात सादर करणार आहेत. सुशील कुमार तिथे होता आणि तो सागर धनकडला मारहाण करत होता हे या व्हिडीओतून स्पष्ट झालं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SSC Board Exam | नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन- वर्षा गायकवाड

लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर अनेक लाटा येतील; राहुल गांधींचा केंद्र सरकारला इशारा