in

आज दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन; वसई-विरार पोलीसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

संदीप गायकवाड | वसई-विरार : गणेशोत्सवासाठी वसई विरार महापालिका हद्दीत पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आज शनिवारी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. दीड ते 11 दिवसा पर्यंतच्या गणेशोत्सवासाठी शासनाच्या सूचनेनुसार वसई विरार शहर महापालिका आणि मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय कडून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्या सुचनाप्रमाणेच प्रत्येक गणेशभक्त, गणेश मंडळ यांनी आपला उत्सव साजरा करायचा आहे.

  • आज पासून सुरू होणाऱ्या विसर्जन स्थळा साठी महापालिकेने 9 प्रभागात एकूण 44 तलाव निश्चित केले आहेत. याच तलावावर शासनाचे नियम पाळून गणरायाचे विसर्जन करायचे आहे.
  • विसर्जन च्या वेळी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गणेशभक्तांनी आपल्या मंडळात, किंवा घरीच आरती घेऊन, विसर्जन स्थळावर जायचे आहे. मूर्तीसोबत फक्त 4 च गणेशभक्तांना विसर्जनस्थळावर प्रवेश दिला जाणार आहे.
  • रात्री 8 वाजेपर्यंतच विसर्जन करणे सर्वांवर बंधनकारक आहे
  • वसई विरार नालासोपारा परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 450 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 750 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.
  • तसेच वाहतूक शाखा, होमगार्ड, दंगलनियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, ही तैनात असणार आहेत.
  • विसर्जन तलाव, मोक्याचे नाके, वाहतूक कोंडी होणारे परिसर, तसेच नाकाबंदी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा असणार आहे.
  • कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी शासनाचे सर्व नियम पाळून, आजचे विसर्जन आणि पुढील बाप्पाचा उत्सव साजरा करावा असे अहवान महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Rape case | महाराष्ट्रातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका – चित्रा वाघ

Dadar