in

‘लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला परवानगी नाही’

देशभरात कोरोना लसीकरण अभियान चालू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिल्याचे वृत्त आले होते.मात्र, आत्तापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने लसीच्या वापरासाठी मान्यता दिली नसल्याचे सांगितले आहे.

मूल्यमापन अद्याप सुरू आहे. काही गोंधळ आहे आणि तज्ज्ञ समितीशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने त्याला मान्यता दिलेली नाही, अशी मीहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.दरम्यान, भारत बायोटेकने शनिवारी २-१८ वयोगटातील मुलांसाठी चाचणी डेटा DCGI ला पाठवला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.कृष्णा एला यांनी ही माहिती दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू; उर्जामंत्र्यांची माहिती

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला, अशी आहे नवी नियमावली