in ,

1 नोव्हेंबरपासून बदलणार महत्त्वाचे नियम; वाचा सविस्तर

नवीन महिन्यात अनेक नियम बदलणार आहेत, जे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या बदललेल्या नियमांचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा थेट तुमच्या खिशाला फटका बसू शकतो. 1 नोव्हेंबर पासून देशभरातील बँकिंग, स्वयंपाकाचा गॅस बुकिंग नियम, रेल्वे या क्षेत्रात अनेक मोठे बदल होणार आहेत.

काय बदल होणार आहेत ते जाणून घ्या…

1) बँकिंग मोफत सेवा बंद
बँकेत पैसे जमा करने असो व पैसे काढणे शुल्क आकारले जाणार आहे. गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये देखील होणार मोठा बदल आहे. यासोबतच रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे.बचत खात्याच्या ग्राहकांसाठी तीनपट पैसे जमा करणे विनामूल्य आहे.

2) रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलणार –
देशभरातील भारतीय रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. 13 हजार पॅसेंजर ट्रेन आणि 7 हजार मालगाड्याच्या वेळा बदलणार आहेत. एवढेच नाही तर 1 नोव्हेंबरपासून देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळाही बदलणार आहेत. १ जुलैपासून गाड्यांच्या वेळेत बदल होणार होते. कोरोनामुळे यात नोव्हेंबरमध्ये वाढ करण्यात आली.

3) गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम
आता थेट सिलिंडर घेता येणार नाही.
गॅस बुक केल्यानंतर, ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. जेव्हा सिलिंडर डिलिव्हरी बॉयलाओटीपी डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. हा कोड सिस्टीमशी जुळल्यानंतर ग्राहकाला फक्त सिलिंडरची डिलिव्हरी मिळेल.गॅसचोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकांची ओळख व्हावी यासाठी तेल कंपन्यांनी नवीन प्रणाली लागू केली आहे.

4 ) एलपीजी सिलेंडरची किंमत
एलपीजीच्या विक्रीतील तोटा पाहता सरकार पुन्हा एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवू शकते. 1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात
1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडर वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे.

5) Whatsapp बंद होईल

काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअॅप काम करणे बंद करेल. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म Android 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Megablock in Mumbai; उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

महिला बचत गटातर्फे दिवाळी फराळ साहित्य विक्री प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन