in ,

चले तो चाँद तक… : चीनची लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह

कोणत्याही चिनी उत्पादनाबद्दल सांगितले जाते की, ‘चले तो चाँद तक, नहीं तो शाम तक…’ याचा प्रत्यय प्रत्यक्ष पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी चीनची कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आणि त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द त्यांनीच ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. भारतातही, विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाचे पुन्हा उद्रेक झाला आहे. बहुतांश देशात लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. पाकिस्तानातही लसीकरण सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी देखील गुरुवारी लस घेतली होती. इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक फैजल सुल्तान यांनी देखील ट्विट करून इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतले आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा कर्मचारीवर्ग तसेच त्यांना या दोन-तीन दिवसांत भेटणाऱ्या व्यक्तींचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याची माहिती दिली होती तसेच कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. पाकिस्तानात 62 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण असून मृतांची संख्या 13 हजारांहून अधिक आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation: आणखी किती पिढ्यांपर्यंत आरक्षण सुरू ठेवणार? सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिप्रश्न

SACHIN VAZE ISSUE : महासंचालक परमबीरसिंह यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… 100 कोटींच्या वसुलीचे वाझेंना टार्गेट