in

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीने घेतलं रौद्ररूप

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीची पाणीपातळी वाढली आहे. आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने कहर केला आहे त्यामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेरची वालधुनी नदीला मोठा प्रवाह आला आहे.

वालधुनी नदी अंबरनाथ जवळच्या तावलीच्या डोंगरात उगम पावते. कालपासून डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक धबधबे प्रवाहित झाले असून या नदीला मोठा प्रवाह आला आहे. ही नदी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहत असून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या अगदी बाजूनेच वालधुनी नदी वाहते. या नदीला आलेल्या मोठ्या प्रवाहामुळे काही काळासाठी शिवमंदिरात जाणारे पूल सुद्धा पाण्याखाली गेले होते. सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता.

त्यामुळे नदीचा प्रवाह सुद्धा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून त्यामुळे वालधुनी नदीला शिव मंदिर परिसरात रौद्ररूप आल्याचं पाहायला मिळतंय.तर दुसरीकडे लहान मुले आपला जीव धोक्यात घालून या नदी मध्ये उडी मारून पोहतांना दिसत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा ऋता दुर्गुळेचा हटके अंदाज

सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना अतिउत्साहीपणा नडला