in

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविली

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला असून आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत रिटर्न भरता येणार आहे. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची 31 जुलै 2021 ची अंतिम मुदत होती, जी आता वाढविण्यात आलीय. आता सामान्य करदाता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत रिटर्न भरू शकणार आहेत.

‘या’ तारखा वाढवल्या

(1) मूल्यांकन वर्ष 2021-22 (वित्तीय वर्ष) साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 ने वाढवून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत करण्यात आलीय.
(2) इन्कम टॅक्स ऑडिट अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 पासून वाढवून 30 नोव्हेंबर 2021 करण्यात आलीय. त्याचबरोबर टॅक्स ऑडिट रिपोर्ट फायनल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरहून वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आलीय.
(3) बिलेटेड/सुधारित आयकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आली. हे 31 डिसेंबर 2021 हून वाढवून 31 जानेवारी 2021 करण्यात आलीय. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी मूळ मुदत संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न भरले जाते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदींनी जाणून घेतला ‘हिवरेबाजारचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न’

पंतप्रधान मोदी खूप दिलदार, महाराष्ट्र-गोव्यासाठी १५०० कोटी देतील: संजय राऊत