in

IND vs ENG: इंग्लंडने जिंकली नाणेफेक

भारत आजपासून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मोहिमेला प्रारंभ करत आहे. उभय संघात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना रंगत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकण्याची परंपरा इंग्लंडने कायम ठेवली असून कर्णधार ईऑन मॉर्गनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

टी-20 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलेला मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांना आज संघाबाहेर बसवण्यात आले आहे. त्यामुळे लोकेश राहुलकडे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून चमकदार कामगिरी केलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृ्ष्णा यांनी आजच्या सामन्यातून भारतीय संघात एकदिवसीय पदार्पण केले आहेत.

प्लेईंग XI

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा.

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद, मार्क वूड.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लॉकडाउन शेवटचाच पर्याय!; राजेश टोपे

गडचिरोलीत 4 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण