in ,

देशात कोरोना विस्फोट : पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाखांहून अधिक

देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार ९८८ इतकी आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ कोटी 91 लाख ६४ हजार ९६९ वर पोहोचली आहे. यापैकी १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू झाला.

सध्याच्या घडीला देशात ३२ लाख ६८ हजार ७१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होणं गरजेचं’

MU Vs CSK | कांटे की टक्कर; मुंबईची चेन्नई विरुद्ध लढत