in

IND vs SL 2nd ODI LIVE : भारताची फलंदाजी ढेपाळली; हार्दिक पंड्या शून्यावर बाद

भारता विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ५० षटकात ९ बाद २७५ धावा ठोकल्या आहेत. यामुळे भारतासमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान भारताच्या डावाला सुरूवात झाली असून 13 धावावर पृथ्वी शॉ चा पहिला बळी गेला आहे.

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हसरंगाने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. पृथ्वीला फक्त १३ धावा करता आल्या.

लंकेचा तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने धावांचे योगदान दिल्यामुळे लंकेला पावणेतीनशेचा टप्पा ओलांडता आला. शेवटच्या दोन चेंडूवर करुणात्नेने दोन चौकार खेचले. करुणारत्नेने ५ चौकारांसह नाबाद ४४ धावांची खेळी केली. यासह श्रीलंकेने ५० षटकात ९ बाद २७५ धावा केल्या आहेत. भारताकडून चहल आणि भुवनेश्वरला प्रत्येकी ३ बळी घेता आले. दीपक चहरने २ बळी टिपले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

VIDEO : महापालिकेच्या सभेत विरोधकांचा गोंधळ; ऑफलाईन सभेची केली मागणी

Gold Silver Rate Today | शेअर बाजारातील घसरणीनंतर सोने महागले