देशातील कोरोनाग्रस्तांनी संख्या झपाट्याने वाढत असताना इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. तरुण वर्गात वेगाने पसरणारा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्याचे पत्रात सुचवण्यात आले आहे. या पत्रात असोसिएशनने सहा महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धचा सुरू असतानाच देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं सांगताना खेद होत आहे, असं म्हटलं आहे. तसेच पुढे देशामध्य सध्या सात लाख ४० हजार अॅक्टीव्ह कोरोना रुग्ण असल्याचंही इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर चार एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. ही कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे, असंही कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त करताना देशातील डॉक्टरांच्या या सर्वात मोठ्या संस्थेनं म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांना २५ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण करण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यामुळे तरुणांचे लसीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे.
Comments
Loading…