in

Indian Railway | स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वेची मोठी घोषणा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटमुळे हजारो स्थलांतरित मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे. मुंबईतील अनेक मोठ्या रेल्वे स्थानकाबाहेर शेकडो किलोमीटरच्या रांगा लावून मजुरांचे आपल्या राज्यात पोहचण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. दादर, सीएसएमटी, बोरिवली, वांद्रा रेल्वेस्थानकाबाहेर मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी यला मिळतेय. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनदरम्यान मजुरांचे हाल होऊन नये यासाठी भारतीय रेल्वेने ७० टक्के क्षमतेने गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वे प्रशासन लवकरंच १३३ नव्या रेल्वे गाड्या सुरु करण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये ८८ समर स्पेशल आणि ४५ या उत्सव स्पेशल ट्रेन आहेत. पुढच्या दोन आठवड्यात या गाड्या सुरु होणार आहे. भारतीय रेल्वेने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रेल्वेने जवळपास ९६२२ स्पेशल ट्रेन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामध्ये साप्ताहिक ट्रेनचा समावेश आहे. दररोज राज्यातून ७७४५ ट्रेन धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने गोरखपूर, पटना, दरभंगा, वाराणसी, गुवाहाटी, प्रयागराज, रांची, लखनऊ यांसारख्या अनेक राज्यांमध्ये अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लोक मरतात हे उद्धव ठाकरेंचे पाप’ – नारायण राणे

‘या’ 2 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण; नीती आयोगाचा प्रस्ताव