in

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे!

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने तसे आदेश एनआयएला दिले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. हा तपास महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाद्वारे (एटीएस) करण्यात येत होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ फेब्रुवारीच्या अखेरीस एक स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. या प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. ती स्कॉर्पिओ गाडी ठाण्याच्या मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आले. पण काही दिवसांतच त्यांचा मृतदेह मुब्र्याच्या रेतीबंदर येथे आढळला. या प्रकरणाचा तपास एटीएस करीत होते.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमध्ये हात असल्याचा संशय एटीएसने काल ठाणे न्यायालयात व्यक्त केला होता. त्याआधारे तपास करताना एटीएसने काही पुरावे देखील दिले होते. पण आता या प्रकरणाचा तपास देखील एनआयएकडे सोपविण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह सापडला!

फायनल! दहावी आणि बारावी परीक्षा होणार वेळेतच आणि त्याही ऑफलाइन!