in

IPL 2021 MI vs KKR: सामना कधी, कुठे, केव्हा?

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) पाचवा सामना मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. आज मुंबई मागील सामन्यातला पराभव विसरुन जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर थाटात सुरुवात केलेला कोलकाता संघ दुसऱ्या विजयासाठी आसुसलेला असेल. दोन्ही संघात तितकेच तुल्यबळ आणि सामना फिरवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत.

मुंबई इंडियन्स
ख्रिस लिनऐवजी आज मुंबईच्या संघात क्विंटन डि कॉक पुनरागमन करु शकतो. क्विंटनने पुनरागमन केलं तर मुंबईच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक करतील. इशान किशान, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड असे एकापेक्षा एक फलंदाज चेन्नईच्या मैदानावर आपला जलवा दाखवतील. तर जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, कुल्टर नाईल वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

कोलकाता नाईट रायडर्स
दुसरीकडे कोलकात्याचा संघात नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, ओयन मॉर्गन असे स्फोटक बॅट्समन आहेत. तर शाकिब अल हसन आणि आंद्रे रसेल यांच्यासारखे जगातले सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, पॅट कमिन्स, हरभजन सिंग या गोलंदाजांवर मुंबईला रोखण्याची मदार असेल.

सामना कधी आणि कुठे…?
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील पहिला सामना आज 13 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरु होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात ममतांचं धरणे आंदोलन

म्हाडाचं ताडदेव हॉस्टेल महिलांसाठी राखीव… एक हजार महिलांसाठी सुविधा