in

IPL 2021:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा राजस्थान रॉयल्सशी सामना

आयपीएल 2021 स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात हा सामना संध्याकाळी सुरु होईल. तर यंदाच्या हंगामात बंगळुरुने तीनही सामने जिंकले आहेत, त्यामुळे हीच विजयी लय कायम राखण्याचा विराट सेनेचा मानस असणार आहे.

बंगळुरुची या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात झाली आहे. बंगळुरुने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. त्यामुळे या सामन्यात राजस्थानला पराभूत करून विजयी चौकार लावण्यासाठी विराटसेना सज्ज झाली आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकून पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी येण्याचं बंगळुरुचं लक्ष्य आहे. तर राजस्थान रॉयल्सची या स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तीन पैकी एक सामना जिंकण्यात राजस्थानला यश मिळालं आहे.

आयपीएल कारकिर्दीत बंगळुरु आणि राजस्थान हे दोन संघ २२ वेळा आमनेसामने आले आहेत. दोघांनी १०-१० सामने जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ बंगळुरुची विजयी घोडदौड थांबवणार का? याकडे लक्ष लागून आहे.

बंगळुरु: विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज. केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, जोशुआ फिलिप, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, अॅडम जाम्पा, कायल जेमिसन, रजत पाटिदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डेन ख्रिश्चन, केएस भरत, सुयश प्रभुदेसाई, डॅनिअल सॅम्स आणि हर्षल पटेल

राजस्थान: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेविड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाळ, मयंक मार्कंडेय, अँड्र्यु टाय, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, कुलदीप यादव आणि आकाश सिंह

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संकटकाळात नफेखोरीला केंद्राकडून मान्यता कशी?; सोनिया गांधींचे मोदींना पत्र

नितीन गडकरीचा पुढाकार; महाराष्ट्राला दररोज 97 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार!