in

Maharashtra Lockdown : “पोलिसांना लाठ्यांचा वापर करायला लावू नका”, पोलीस महासंचालकांचा इशारा

महाराष्ट्रात आज रात्री ८ वाजल्यापासून पुढील पंधरा दिवस कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पोलीस दलाला काठ्यांचा वापर करण्यात भाग पाडू नका, असा इशारा दिला आहे.

 राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावं. आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलं.

पोलिसांकडे पॉवर आहेत, अॅक्ट आहेत, आम्ही त्याचा कमीत कमी त्याचा वापर करू. मात्र लोकांनी सहकार्य केलं नाही तर कारवाई निश्चित होणार, त्यात वाद नाही. आम्हाला कारवाई करायची नाहीय. विनाकारण कारवाई करायची नाही याची हमी देतो. पण तुम्हीही कायद्याचा आदर करा. सहकार्य करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धारावीतल्या 18 वर्षांवरील सर्वांना लस द्यावी; खा. राहुल शेवाळे यांची मागणी

SRH vs RCB Live Score | हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान