in

… हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना?

“भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेली २५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या २५ वर्षात असं कधीच घडले नाही. त्यामुळे हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे,” अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विटर व्यक्त केली.

मुबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडुपरच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पाणी शिरले. २६ जुलैच्या पावसातही भांडुप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते. त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे, असेही अॅड शेलार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सोयरिक’ लवकरच जुळणार…

Video | मुंबईत दिवसाढवळ्या वकिलावर तलवारीने हल्ला