in

अमेरिकेत 9/11 ला झालेल्या ‘त्या’ हल्ल्याला 20 वर्ष पुर्ण

20 वर्षांपुर्वी अमेरिकेत तीन ठिकाणी विमाने धडकावून हल्ले करण्यात आले होते. न्यूयॉर्क येथील ट्विन टॉवर्सही यावेळी पाडण्यात आले होते. अमेरिकेने 9/11 ला झालेल्या हल्ल्याच्या स्मृती दिनीनिमीत्त या हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहतानाच या घटनेच्या दुख:द स्मृती जागवल्या.

ज्या तीन ठिकाणी विमाने धडकावून हल्ले करण्याचा प्रकार घडला होता, त्या तिन्ही ठिकाणी अध्यक्ष बायडेन यांनी आज भेटी देऊन तेथील मृतांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली, व्हाइट हाऊसतर्फे त्यांचा ध्वनिमुद्रीत संदेशही ऐकवण्यात आला. या संदेशात अध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यानंतर अमेरिकन नागरीकांमध्ये देशभर जे सहकार्याचे वातावरण निर्माण झाले होते तेच वातावरण अमेरिकन नागरीकांनी जागवण्याची गरज आहे.

या हल्ल्याला कितीही वर्ष झाली असली तरी त्याच्या स्मृती जेव्हा आपल्या मनात येतात त्यावेळी काही सेकंदांपुर्वीच हा हल्ला झाल्यासारखा आपल्याला वाटत राहतो. पहिल्यांदा बायडेन यांनी पुर्वी ज्या ठिकाणी ट्विन टॉवर्स उभारण्यात आले होते, तेथे जाऊन आदरांजली वाहिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऐनवेळी तालिबानने सरकारचा शपथविधी केला रद्द

सप्टेंबर महिन्यातही कोविड रुग्ण संख्या आटोक्‍यातच