in

जनता कर्फ्यूला आज 1 वर्ष पूर्ण

गेल्या वर्षी संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर 24 तासांसाठी संपूर्ण देश थांबला होता. “…आज देशातील नागरिकांकडून आणखी एका गोष्टीसाठी समर्थन मागत आहे, ते म्हणजे जनता कर्फ्यू… अर्थात जनतेसाठी… जनतेकडून स्वतःवर लावण्यात आलेला कर्फ्यू…” अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 135 कोटी देशवासीयांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. गेल्यावर्षी याच दिवशी संपूर्ण भारत थांबला होता. आज या ‘जनता कर्फ्यू’ला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

गेल्या वर्षी 30 जानेवारीला भारतात पहिला कोरोनारुग्ण आढळला. तेव्हा, हा आजार नेमका कसा आहे आणि तो केव्हापर्यंत संपेल हे कुणालाही माहीत नव्हते. पाहता पाहता कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, तेव्हा केंद्र सरकारने कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून सर्वप्रथम 22 मार्च 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले.

या जनता कर्फ्यूमध्ये 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्येकाला आपल्या घरातच राहायचे होते. यावेळी सर्व बाजार, दुकान, सर्वजनिक वाहन, कार्यालये आणि शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले होते. यात केवळ अत्यंत आवश्यक असलेल्या क्षेत्रांतील लोकांनाच कामावर जाण्याची सूट देण्यात आलेली होती.

मोदींनी जनता कर्फ्यूसह जनतेला आणखी एक आवाहन केले होते. 22 मार्चला सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी आपल्या घराच्या बालकनीत उभे राहून टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे हे आवाहन होते. देशात कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स ना सॅल्यूट करणे, असा या मागचा होतू होता.

मोदींच्या या आवाहनाचा परिणाम संपूर्ण देशावर झाला होता. केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारखी मोठी शहरेच नाही, तर छोट्यातील छोटे गावही या जनता कर्फ्यूचा भाग झाले होते. देशात वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे काही भागात पुन्हा जनता कर्फ्यूला लागण्यास सुरुवात झाली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट

Jammu & Kashmir | शोपियानमधील चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा