in

राणेंवर केलेली कुरघोडी सेनेच्याच अंगलट; जानवली ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे

जानवली ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीच्या पूर्वसंध्येलाच राजकीय हालचाली वेग आला होता. जानवली गावचे प्रभारी सरपंच काका राणे आणि अमोल राणे यांचा कार्यकर्त्यानी शिवसेनेचे प्रवेश केला होता. त्यामुळे सरपंच निवड चुरशीची होण्याची शक्यता होती. मात्र तरीही जानवली ग्रामपंचायतीचे मैदान भाजपने मारले. भाजपच्या शुभदा रावराणे या सरपंचपदी विराजमान झाल्या.

जानवली गावचे प्रभारी सरपंच काका राणे आणि अमोल राणे यांचा कार्यकर्त्यासह शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सेना प्रवेश झालाय. सरपंच निवडीच्या आदल्या दिवशीच शिवसेनेत प्रवेश घेऊन कणकवलीचे आमदार नितेश राणेंना त्यांच्याच होमपीचवर जोरदार धक्का दिला. मात्र या प्रवेशाला 24 तास होत नाहीत तोच आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर पलटवार केला.

सरपंचपदाच्या निवडणुकीच्या प्रत्यक्षात सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊन भाजपच्या शुभदा रावराणे या सरपंचपदी विराजमान झाल्या. जानवली ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या सरपंच निवडीसाठीच्या विशेष बैठकीत शुभदा रावराणे या बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पी. डी. पालकर यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown: राज्यात संपूर्ण लॉकडाऊन; नवीन नियमावली जाहीर

Maharashtra Lockdown : सर्वसामान्यांसाठी लोकल सेवाही बंद